エピソード

  • मन में है विश्वास: विश्वास नांगरे पाटील (नमुना प्रकरण)
    2026/09/23

    पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील लिखित ‘मन में है विश्वास’ या आत्मकथनपर पुस्तक.
    स्वतःविषयी खरं लिहिणं हा जीवघेणा अनुभव असतो तरीही विश्वास नांगरे-पाटील यांनी स्वतःला मोकळेपणाने व्यक्त केलंय.
    पल्या कुटुंबाची, समाजाची पुनर्तपासणी केलीय, नात्यागोत्यातील उभ्या-आडव्या धाग्यांचा छेद घेऊन उकल केलीये. अ
    त्यंत प्रत्ययकारी भाषेत असलेले हे आत्मकथन लेखकाच्या प्रगल्भ मनाची जाणीव करून देते.
    ऐका आजच विश्वास नांगरे पाटील यांच्या आवाजात स्टोरीटेल app वर. इथे ऐका नमुना प्रकरण.

    続きを読む 一部表示
    12 分
  • वेशिपलीकडे: सुहास शिरवळकर veshipalikade: Suhas Shirvalkar
    2026/09/16

    जेथे विज्ञानाचा तर्क संपतो, तिथून 'वेशीपलीकडे'चे जग सुरू होते! सुहास शिरवळकर यांची ही कादंबरी तुम्हाला एका अशा गूढ विश्वात घेऊन जाते, जिथे अतर्क्य घटना आणि अदृश्य शक्तींचा वावर आहे. गावाच्या वेशीबाहेर दडलेली ती जुनी रहस्ये आणि काळजाचा ठोका चुकवणारे ते अनुभव... हे सर्व विज्ञानाच्या कसोटीवर उतरणारे नाही, तर केवळ अनुभवण्याचे आहे. एका साध्या प्रवासाचे रूपांतर जेव्हा भीतीच्या छायेत होते, तेव्हा सुरू होतो जीवघेणा संघर्ष. शिरवळकरांनी उभं केलेलं हे अतींद्रिय (Paranormal) जग तुमच्या कल्पनाशक्तीला आव्हान देईल. रात्रीच्या शांततेत ऐकताना अंगावर शहारा आणणारी ही एक उत्कृष्ट गूढकथा आहे. काय आहे त्या वेशीपलीकडचे रहस्य? जाणून घेण्यासाठी आजच ऐका 'वेशीपलीकडे' - फक्त स्टोरीटेल वर! (येथे ऐका नमुना प्रकरण सचिन सुरेश यांच्या आवजात.)

    続きを読む 一部表示
    49 分
  • तृतीय नेत्र: भाग २ : संजय सोनवणी Tritiya Netra: 2: Sanjay Sonawani
    2026/09/09

    राहुल आणि कविताची नजर चुकवून मीनाक्षी तृतीय नेत्र ताब्यात घेऊन सटकली खरी, पण तिचा प्रवास सोपा नव्हता. तरीही अपार बुद्धिमत्ता वापरत ती शत्रूना मात द्यायचा अथक प्रयत्न करत होती... आणि ज्यासाठी तिने एवढा अट्टाहास केला होता त्या तृतीय नेत्राची अखेर नियती तरी काय होती? मुळात मीनाक्षी होती तरी नेमकी कोण? तिचे काय झाले अखेर? राहुल आणि कविता आपण कष्टाने शोधलेल्या पण पुन्हा आपल्या हातातून गायब झालेल्या तृतीय नेत्राच्या शोधात जीव धोक्यात घालून पोलीस व ऍड गणेश गायकवाडच्या मदतीने कष्ट घेत होते खरे, पण उलगडले का त्यांना तृतीय रत्नाचे आणि त्यासाठी एवढा रक्तपात का चालू आहे यामागील रहस्य?
    संजय सोनवणी लिखीत या वादळी कथेत विलक्षण रहस्याने ओथंबलेल्या, चक्रावून टाकणाऱ्या, मानवी संवेदना गोठवून टाकण्याचे सामर्थ्य आहे! ऐका परी तेलंग यांच्या आवाजात स्टोरीटेल app वर. आणि इथे ऐका नमुना प्रकरण आजच.

    続きを読む 一部表示
    55 分
  • लूप होल: सुहास शिरवळकर (नमुना प्रकरण)
    2026/09/02

    कायद्याच्या चौकटीत जेव्हा एखादी छोटीशी पळवाट शोधली जाते, तेव्हा सुरू होतो 'लूप होल'चा थरार! सुहास शिरवळकर यांच्या लेखणीतून उतरलेली ही एक वेगवान आणि खिळवून ठेवणारी गुन्हेगारी कथा आहे. एक असा गुन्हा, जो अत्यंत हुशारीने नियोजित केला आहे, पण सत्याच्या प्रवासात कायद्याची एक छोटीशी 'पळवाट' सर्व काही बदलून टाकू शकते. शिरवळकरी शैलीतील संवाद, वेगवान कथानक आणि शेवटपर्यंत टिकून राहणारी उत्सुकता हे या कादंबरीचे वैशिष्ट्य. गुन्हेगार आणि पोलीस यांच्यातील हा 'माईंड गेम' आता ऑडिओबुक स्वरूपात अनुभवा. बुद्धीला चालना देणारे रहस्य आणि अंगावर काटा आणणारा थरार... आजच ऐका प्रसाद फणसे यांच्या आवाजात 'लूप होल' फक्त स्टोरीटेल वर! येथे ऐक नमुना प्रकरण!

    続きを読む 一部表示
    16 分
  • राधा: समर Radha : Samar (नमुना प्रकरण)
    2026/08/26

    श्रावणी नावाची बावीस वर्षीय तरूणी दुःखातून बाहेर पडण्यासाठी आणि भविष्याबाबत शांतपणे चिंतन करण्यासाठी वृंदावनात जाते. तिथे तिला अनपेक्षितपणे राधा भेटते. श्रावणीला काही प्रश्नांची उत्तरं हवी असतात. ती राधेला ते प्रश्न विचारते. राधा त्या प्रश्नांची उत्तरं देतांना वृंदावनातील तिच्या आठवणीही सांगते. श्रीकृष्ण आणि राधेचं नातं श्रावणीला राधेच्या दृष्टीकोनातून समजतं. त्या दोघींच्या संवादातून प्रेम, पुरूष आणि नैतिकतेचे अनेक पैलू उलगडतात. तेच हे एक 'कादंबरीमय उपनिषद !'
    ऐक गौरी लागू यांच्या आवाजात फक्त स्टोरीटेल app वर. येथे ऐका नमुना प्रकरण.

    続きを読む 一部表示
    54 分
  • स्वीकृत: सुहास शिरवळकर (सुशि) नमुना प्रकरण Swikrut: Suhas Shirvalkar (SUSHI) Audio Sample
    2026/08/22

    काही गोष्टी आपण मनाने स्वीकारतो, तर काही परिस्थितीमुळे स्वीकाराव्या लागतात. 'स्वीकृत' ही कादंबरी मानवी मनातील अशाच एका खोल संघर्षाची कथा आहे. नात्यांमधील ओढ, अंतर आणि शेवटी येणारे 'स्वीकार्य' वास्तव सुहास शिरवळकर यांनी अत्यंत संवेदनशीलतेने मांडले आहे. शिरवळकरांची लेखणी इथे केवळ रहस्य मांडत नाही, तर मानवी भावभावनांचे पदर उलगडते. जेव्हा एखादे नाते एका वळणावर येते, तेव्हा मनाची होणारी द्विधा अवस्था आणि त्यातून मार्ग काढण्याची धडपड यात चित्रित केली आहे.
    कौटुंबिक नाट्याचा आणि भावनिक प्रवासाचा भावस्वाद घेणाऱ्या श्रोत्यांसाठी ही एक उत्तम भेट आहे.
    एक प्रगल्भ अनुभव... आजच ऐका 'स्वीकृत' फक्त स्टोरीटेल वर संचित वर्तक यांच्या आवाजात! येथ ऐका नमुना प्रकरण.

    続きを読む 一部表示
    38 分
  • सनसनाटी: सुहास शिरवळकर Sansanati: Suhas Shirvalkar (नमुना प्रकरण)
    2026/08/12

    बुलाख गावातील उत्खननात पुरातत्व खात्याला काही धक्कादायक गोष्टी सापडल्या आहेत. त्या इजिप्शिअन संस्कृतीशी नातं सांगणाऱ्या आहेत. सायल, हवापालटासाठी त्या गावी येते. आणि सुरु होते एक धक्कादायक घटनांची श्रुंखला. त्य गाडल्या गेलेल्या वैभवी प्राचीन संस्कृतीशी सायलीशी काहीतरी संबंध आहे पूर्वजन्मीचा, तो कसा? हे कसे समजते? कहाणी पुढे जाताना कित्येक उत्कंठा वाढवणाऱ्या, रोमांचित करणाऱ्या, घटना घडत जातात, त्या कोणत्या हे नक्की ऐका अनुपमा ताकमोगे यांच्या आवाजात. सुहास शिरवळकर लिखीत सनसनाटी एका वेगळ्याच पार्श्वभूमीवरील थरारक, अद्भुत, रहस्यप्रधान कादंबरी. येथे ऐका नमुना प्रकरण आणि संपूर्ण कादंबरी ऐका स्टोरीटेल app वर .

    続きを読む 一部表示
    41 分
  • डिटेक्टिव्ह अल्फा आणि ग्रामदेवतेचा प्रकोप: सौरभ वागळे (ऐका नमुना प्रकरण)
    2026/08/05

    मुंबईतून कोकणच्या वाटेवर जाताना समुद्रकिनारी, गर्द नारळ-आंब्यांच्या झाडांच्या कुशीत वसलेलं नावगाव हे गाव जितकं सुंदर, तितकेच तिथं राहणारे लोक चमत्कारिक. गावात देव कालभैरवाचं एक पुरातन मंदिर आहे. गावकऱ्यांची अशी समजूत आहे, की या मंदिरातला देव हा जागृत आहे. तो रात्रीच्या अंधारात मंदिराबाहेर पडतो आणि गावाचं रक्षण करतो. पण त्याची दृष्टी इतकी प्रखर आहे, की त्यात चुकून जर कोणी मनुष्य आला, तर तोही जळून भस्म होतो. या देवतेच्या भीतीने गावातले लोक रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडायला घाबरतात. अशा या नावगावातून अल्फाला एक गूढ निनावी पत्र येतं आणि मग सुरू होतो एक जीवघेणा खेळ. गावातले जुने मुरब्बी लोक एक एक करून मरायला लागतात आणि मंदिरातील देवतेचा प्रकोप झाला, अशी गावकऱ्यांची समजूत होते. डिटेक्टिव्ह अल्फा आणि त्याचा मित्र प्रभव यांच्यासमोर आव्हान आहे, या गावात घडणाऱ्या अनैसर्गिक, दैवी वाटणाऱ्या घटनांमागचं सत्य शोधून काढण्याचं. ते हे करू शकतील का ? ऐका सौरभ वागळे लिखीत 'डिटेक्टिव्ह अल्फा आणि ग्रामदेवतेचा प्रकोप'चे नमुना प्रकरण येथे आणि पूर्ण कथा ऐका फक्त स्टोरीटेलवर कृणाल आळवेंच्या दमदार आवाजात.

    続きを読む 一部表示
    29 分