『Storyside Marathi - First Chapter』のカバーアート

Storyside Marathi - First Chapter

Storyside Marathi - First Chapter

著者: Storyside India
無料で聴く

तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात? 'स्टोरीसाइड मराठी: फर्स्ट चॅप्टर्स' मध्ये तुमचे स्वागत आहे! 🎧 येथे तुम्हाला मिळतील मराठीतील सर्वोत्तम ऑडिओबुक्सचे पहिले भाग अगदी मोफत. अजरामर साहित्यापासून ते थरारक क्राईम थ्रिलर्स, प्रेरणादायी चरित्रे आणि आजच्या काळातील बेस्ट-सेलर्सपर्यंत - साहित्याचा हा खजिना आता तुमच्या कानात! प्रत्येक एपिसोडमध्ये एका नव्या कथेची झलक अनुभवा. जर तुम्हाला पुढची गोष्ट ऐकायची असेल, तर आजच 'Storytel' ॲप डाउनलोड करा आणि हजारो मराठी ऑडिओबुक्सचा आनंद घ्या. Love a good story? Welcome to Storyside Marathi: First Chapters! 🎧 Get a front-row seat to the best of Marathi literature in audio. From the timeless classics to gripping crime thrillers, inspiring biographies, and modern-day bestsellers—experience the magic of storytelling on the go. In this podcast, we bring you the exclusive first chapters of our top-rated Marathi audiobooks for free. 👉 Hooked on a story? Don't stop now! Download the Storytel app to listen to the full versions of these titles and explore our massive library of Marathi audio content.@storysideindia アート 文学史・文学批評
エピソード
  • बाय गं... विद्या पोळ- जगताप लिखीत संदीप खरे यांच्या आवाजात (नमुना प्रकरण)
    2026/10/22

    बाईचं संघर्षमय जगणं चित्रित करणं मराठी कादंबरीला नवं नाही... पण बायकांचा समूह मात्र क्वचितच कोणी रंगवला ... बाय गं... या कादंबरीत लहानशा खेड्यातला बायकांचा समूह आपल्याला भेटतो. त्यांचं एकमेकींशी जोडलेपण कळतं, त्यांचे नित्य नवे प्रश्न उमगतात आणि त्यांचं त्या प्रश्नांना भिडणंदेखील.... लहानसं खेडं ते मुंबई.... डोईवरचा पदर ते जीन्स... कुरडया - शेवया ते नूडल्स... निरक्षर आयाबाया ते वकील, डॉक्टर, इंजिनीअर मुली.. एकत्र कुटुंबाचा सांभाळ ते मोठ्या हॉस्पिटलचं व्यवस्थापन... हा लांब पल्ल्याचा प्रवास.... आणि मुख्य म्हणजे हा सारा प्रवास सजगपणे पाहणारी, विचार करणारी नायिका.... अत्यंत ओघवत्या भाषेतली आणि चित्रमय शैलीतली ही विद्या पोळ- जगताप लिखीत कादंबरी आवर्जून ऐकायला हवी, संदीप खरेंच्या भावस्पर्शी आवाजात..... बाय गं... (संपूर्ण कादंबरी ऐका स्टोरीटेल app वर. येथ ऐका नमुना प्रकरण)

    続きを読む 一部表示
    6 分
  • मेंदूतील डिफॉल्ट मोड: यश वेलणकर (नमुना प्रकरण)
    2026/10/07

    मनःशांतीसाठी मनाला जाणणे आवश्यक आहे आणि मन जाणण्यासाठी मेंदूचे कार्य कसे चालते हे पहाणेही आवश्यक आहे. मेंदूचे कार्य कसे चालते याची माहिती घेऊन मेंदूचा डिफॉल्ट मोड कळला की मन प्रसन्न राखण्यासाठी त्याला कशा सूचना द्यायच्या याच्या माईंडफूलनेस तंत्राची माहिती यश वेलणकर यांनी येथे दिली आहे. ऐका फक्त स्टोरीटेल app वर. येथे ऐका नमुना प्रकरण.

    続きを読む 一部表示
    19 分
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません