エピソード

  • # 1761: कर्नल साहेब विहीरीत! ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    2025/05/19

    Send us a text

    सैनिकी शिस्तीचा अतिरेक, आणि ‘नियम हे नियम’ या वृत्तीची मिश्कील खिल्लीही ह्या कथेत आहे.

    続きを読む 一部表示
    1 分
  • # 1760: संथारा किंवा सल्लेखना. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    2025/05/19

    Send us a text

    जैन धर्मियांच्या संथारा व्रत अथवा सल्लेखना वर बंदी घालण्याच्या जयपूर उच्च न्यायालयाच्या २०१५च्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. याच संथारा किंवा सल्लेखना याची माहिती आणि महती सांगणारा हा लेख लिहिला आहे डॅा कल्याण गंगवाल यांनी. ते म्हणतात, वस्तुतः संथारा ही आत्महत्या नसून तो देहत्याग आहे. तो मृत्युमोहोत्सव आहे. हे व्रत म्हणजे परमसाधना आहे वैराग्य आहे व तृप्त जीवन जगण्याचे समाधान आहे व शेवटी आपला मृत्यू कसा असावा याबद्दलचे चिंतन आहे.

    続きを読む 一部表示
    8 分
  • # 1758: "प्रिय कोण? जीवलग मित्र की पती?०....!" लेखक रमेश नागपुरे. कथन प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    2025/05/19

    Send us a text

    तो एक काल्पनिक खेळ होता.

    सर म्हणाले, "तुम्ही या बोर्डवर तीस पस्तीस व्यक्तींची नावे लिहा. ज्यांच्यावर तुम्ही खूप जास्त प्रेम करता त्याचं नाव आधी लिहा."

    "आता चार, दहा, पंधरा... जणांची नावे तुमच्या आयुष्यातून कायमची डिलीट करा कायमची !"

    हळू हळू फळ्यावर फक्त चार नवे उरली. तिचे आई वडील, तिचा जिवलग मित्र आणि तिचा पती.

    तिच्या आयुष्यात तिने कोणा एकाला प्राधान्य दिले? ते ऐकुया.....

    続きを読む 一部表示
    19 分
  • # 1758: "ते चिंचेचे.. प्रेमाचे झाड". लेखिका : नीता चंद्रकांत कुलकर्णी. कथन : (प्रा. सौ.अनुराधा भडसावळे. )
    2025/05/17

    Send us a text

    आमच्या सोसायटीच्या दारातच चिंचेचे झाड आहे. हळूहळू ते मोठ होत जाताना बघणं फार आनंदाच वाटत होत. एके दिवशी बघितलं तर गुलाबी पिवळसर रंगाची फुलं दिसली..एकदा मैत्रीण आली. म्हणाली, "आमचं घर म्हणजे फक्त दोन छोट्या खोल्या होत्या . दारात एक भलं मोठं चिंचेचे झाड होतं. त्याच्या सावलीतच आम्ही अभ्यास केला. गप्पा मारल्या. बाबा आणि आजोबा त्याच्या सावलीत झोपायचे. या झाडाला आज स्पर्श करून खूप समाधान वाटलं बघ.. "

    続きを読む 一部表示
    6 分
  • # 1757: निसर्गरम्य पहलगाम. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    2025/05/16

    Send us a text

    पहलगाम हे भगवान शिवाशी देखील संबंधित आहे. हिंदू परंपरेनुसार त्याचे जुने नाव बैल गाव होते
    हिंदू मान्यतेनुसार, भगवान शिव यांनी अमरनाथ गुहेत प्रवेश करण्यापूर्वी येथे आपला बैल (नंदी) सोडला होता, ज्यामुळे हे गाव पूर्वी बैल गाव म्हणून ओळखले जात असे.
    या बद्दल ची एक गोष्ट प्रचलित आहे. एकदा आई पार्वतीला भगवान शिवाच्या अमरत्वाचे कारण जाणून घ्यायचे होते. यानंतर भगवान शिव यांनी माता पार्वतीला सांगितले की यासाठी तिला योग्य अशा गुप्त ठिकाणी जाऊन अमर कथा ऐकावी लागेल.

    続きを読む 一部表示
    6 分
  • # 1753: एक रुपयात पोटभर आनंद." लेखक रवींद्र पिंगे. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    2025/05/15

    Send us a text

    ‘‘पिंगे, तू अगत्याने तुझा ' नाच रे मोरा' विषयी अनुभव कळवलास त्याचा आनंद झाला. स्वर चिरंतन असतात. म्हणून तर भास्करबुवांच्या चाली शंभर वर्षं टिकून आहेत. एका चित्रपटासाठी मी बांधलेली चाल लोकांनी आपली मानली. आपलीशी केली. ती चाल पु.ल.देशपांडेंची आहे हे लोक विसरलेसुद्धा! पण कोमल सूर जिवंत आहेत."

    हे वाचले आणि माझं भान हरपलं. कलावंताच्या आयुष्याचे सार्थक कशात असतं ते पु.लं.नी दोन वाक्यांत सांगितलं. "जीव लावून काम करा, बस्स!"

    続きを読む 一部表示
    13 分
  • # 1752: ग्रंथपाल योद्धा, आलीया. ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    2025/05/14

    Send us a text

    आलिया मोहम्मद बाकर या इराकमधील बसराच्या मध्यवर्ती ग्रंथालयाच्या ग्रंथपाल होत्या. 2003, इराकमध्ये आलियांनी युद्धाचे संकट लक्षात घेऊन, कोणतीही अधिकृत परवानगी न घेता, ग्रंथालयातील 30,000 हून अधिक पुस्तके लोकांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवली. केवळ आपल्या देशाचा ज्ञान आणि सांस्कृतिक वारसा वाचवण्यासाठी !



    続きを読む 一部表示
    7 分
  • # 1750: आजी निघाली अमेरिकेला. लेखिका: शोभा पिंगळे. कथन: ( आसावरी हंजे.)
    2025/05/13

    Send us a text

    एक दिवस आदित्यच्या वडिलांना एक कल्पना सुचली.नोकरीमुळे आपल्या दोघांना अमेरिकेला जाता येत नाहीय,पण आजीला पाठवलं तर आदित्यकडे?
    ती हुशार आहे,तिची तब्बेत ही ठणठणीत आहे.आणि महत्वाच म्हणजे तिचा आदित्यवर फार जीव आहे.

    आजीचा हा पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे आपण ऑक्सिजन वरच आहोत अस आजीला वाटत होतं.सुदैवाने एअर होस्टेस चांगली होती. तिनं आजीला जास्तीची फळं, बिस्किटे दिली.

    続きを読む 一部表示
    7 分