『स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum』のカバーアート

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

著者: Santosh Deshpande
無料で聴く

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel. स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.Mediacura Infoline アート 文学史・文学批評
エピソード
  • मुलांसाठीची `वाचन साखळी`
    2026/07/11

    शाळेतील मुलांमध्ये वाचनाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि ही पालकांपुढची नवी समस्या आहे. ग्रामीण भागात तर त्यासाठी पूरक वातावरणही नसते. वाचन कमी होण्यामागे अनेक कारणे असली तरी त्यात समाज म्हणून आपण काही करण्याची गरज आहे, हे ओळखून पुण्यातील बालक-पालक फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून गेली काही वर्षांपासून ग्रामीण भागातील मुलांसाठी `वाचन साखळी` संकल्पना रुजते आहे. या संकल्पनेचे प्रणेते विनायक जोशी यांना याच बाबत बोलतं केलं आहे, संतोष देशपांडे यांनी. ही संकल्पना नेमकी काय आहे, त्यातून मुलांचं पुस्तकांशी नातं कसं जोडलं जातं, कोणती पुस्तक त्यांना वाचायला मिळतात, त्यांचा प्रतिसाद कसा असतो अशा अनेक बाबींची उकल या संवादातून होते. नव्या पिढीची बौद्धिक मशागत करु पाहणाऱ्या या उपक्रमाची व्याप्ती वाढण्यासाठी त्यात समाजाचा सहभागही वाढायलाच हवा, त्यासाठी काय करावे हे देखील या संवादातून स्पष्ट होते. प्रत्येकाने जरुर ऐकावा आणि आपल्या परीने इतरांपर्यंत हा विचार, हा उपक्रम पोहोचवावा आणि वाचन-साखळीचा दुवा बनावे.

    続きを読む 一部表示
    32 分
  • FIFA वर्ल्डकप कोण जिंकणार?
    2026/06/28

    सध्या जगभरातील फुटबॉलप्रेमी FIFA वर्ल्ड कपच्या स्पर्धेत रमले आहेत. आता knock out राऊंड सुरू होतोय, तेव्हा चर्चा होतेय ती विजेतेपद कोणाला मिळणार याची. भारतीय लष्करात ब्रिगेडियर म्हणून सेवा बजावलेले सुमंत दशरथ हे स्वतः उत्तम फुटबॉलपटू म्हणूनही प्रसिद्ध आहेत. या खेळाचे चाहते म्हणून त्यांनी आजवरच्या सामन्यांचे विश्लेषण आणि काही अंदाज मांडले आहेत. त्याबाबत संतोष देशपांडे यांसोबत रंगलेल्या या स्टोरीटेल कट्ट्यावरच्या गप्पा तमाम फुटबॉलप्रेमींना नक्की आवडतील!

    続きを読む 一部表示
    22 分
  • ‘श्रीमानयोगी’चं शिवधनुष्य पेलताना..
    2026/06/14

    मराठी साहित्यातील एक अजरामर साहित्यकृती म्हणून 'श्रीमानयोगी' ओळखली जाते. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाचा सहजसुंदर वेध घेणारे सिद्धहस्त लेखक रणजित देसाई यांची ही कादंबरी आता 'स्टोरीटेल' वर श्राव्य स्वरुपात दाखल झाली आहे. त्यास ज्यांचा आवाज लाभला आहे, ते प्रसिद्ध अभिवाचन कलाकार अनिरुद्ध दडके यांच्या समवेत रंगलेल्या या विशेष पॉडकास्ट मधून हा सारा प्रवास तर पुढे येतोच शिवाय 'श्रीमानयोगी' मधून त्यांना घडलेले शिवरायांचे असामान्य दर्शनही घडते.

    श्रीमानयोगी ऐकण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा-
    https://storytel.com/in/books/shriman-yogi-14292004?utm_source=internal&utm_medium=app_link&utm_campaign=share_links

    続きを読む 一部表示
    36 分
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません