エピソード

  • १२ | या'अबुरने Ya'aburnee | Samiksha Salunke | Kaajal Tikli Ani Kavita | You bury me
    2021/10/01

    'या अबुरने' याचा शब्दशः अर्थ 'तू मला दफन कर..' असा होतो . यामागची भावना मात्र आहे एका आशेची, की तुझ्या आधी मला मरण यावं कारण तुझ्या प्रेमाशिवाय जगणं मुश्किल आहे..

    続きを読む 一部表示
    5 分
  • ११ | हल्ली बाप्पा लहान झालाय Samiksha Salunke | Kaajal Tikli Ani Kavita | #Ganpati #Bappa Special
    2021/09/10

    देवाच्या अस्तित्वावर रोज प्रश्नचिन्ह उभी राहत असली, तरी आपण आपल्या परंपरा चालवत राहतो.. आपापल्या बुद्धिनुसार अपडेट करत राहतो.. आणि कानगोष्टी खेळताना जसं होतं ना.. पहिल्या मुलाने सांगितलेली गोष्ट शेवटच्या मुलापर्यंत पोहोचेतो होत्याची नव्हती झालेली असते, तसंच काहीसं परंपरांचं होतं..

    続きを読む 一部表示
    5 分
  • १० | दृष्टी | Sight काजळ टिकली आणि कविता Samiksha Salunke | Kaajal Tikli Ani Kavita 10
    2021/08/23

    कधी-कधी आपल्यासमोर असे प्रसंग उभे राहतात, की हेच पाहायला एवढा अट्टाहास केला का? असं आपल्याला वाटतं. जरा एक कॉमन डायलॉग सांगते, म्हणजे आपल्या लक्षात येईल, "देवा ss, हे पाहण्या आधी माझे डोळे का नाही मिटले.." माणसाला असलेलं दृष्टीचं वरदान हे एक बंधन केव्हा वाटू लागेल, त्यावर लिहिलेली ही कविता आहे..

    続きを読む 一部表示
    5 分
  • ०९ | चिडिया और चिंटीया | Ant March काजळ टिकली आणि कविता Samiksha Salunke | Kaajal Tikli Ani Kavita 09
    2021/07/30

    मी रोज सकाळी ट्राफिक टाळण्यासाठी लवकरात लवकर घरातून बाहेर पडायचे आणि रस्त्याच्या डाव्या बाजूने जाणाऱ्या बजेट वाल्या दुचाकी घोड्यांच्या रांगेतून माझा सुंदर सोनेरी घोडा दामटवायचे. चारचाकी खिडक्यांतून आम्हा घोडेस्वारांवर पडणारे सिम्पथेटिक कटाक्ष मीदेखील दोन पायांनी धावत ऑफिस गाठणाऱ्या प्राण्यांवर टाकायचे आणि असं करत असताना आपणही त्या गर्दीचा भाग आहोत हे हमखास विसरून जायचे. तर याच रोजच्या रटाळ प्रसंगाला जरा वेगळ्या अँगल ने पाहण्याचा प्रयत्न मी या कवितेत केला आहे..

    続きを読む 一部表示
    5 分
  • ०८ | शृंखला | Chain काजळ टिकली आणि कविता Samiksha Salunke | Kaajal Tikli Ani Kavita 08
    2021/07/23

    एका विचित्र अवस्थेतून जाणारं एक जोडपं.. प्रेम तर आहे; पण जशी स्वप्नं  पाहिली होती किंवा दाखवली गेली होती म्हणा, तसं ते काही बहरत वगैरे  नाहीये.. कुठेतरी अडलंय, खुंटलंय, एक बांध बसलाय त्यावर..  सहवासाने प्रेम  वाढतं हे ऐकून माहीत आहे पण 'अतिपरिचयात अवज्ञा' हे अनुभवाने नव्यानेच  माहीत झालंय. तर अशा एका जोडप्याची अवस्था मी या गझलेत मांडण्याचा प्रयत्न  केलाय..

    続きを読む 一部表示
    6 分
  • ०७ | कौआ | Crow काजळ टिकली आणि कविता Samiksha Salunke | Kaajal Tikli Ani Kavita 07
    2021/07/16

    आपण मर्त्य आहोत, या जाणिवेला डिप्रेशनची संगत नको म्हणून आपल्याकडे पूर्वापार पुनर्जन्माच्या गोष्टी सांगण्यात येत असाव्यात, असा काहीसा माझा अंदाज आहे. की जरी हा जन्म संपला तरी आपण वेगवेगळ्या योन्यांमधून जन्म घेत राहतो किंवा तारा बनतो किंवा आणखी काही बाही! अशाच एका रूढ समजुतीवरून ही कविता लिहिली आहे.

    続きを読む 一部表示
    6 分
  • ०६ | कलाकार | Artists काजळ टिकली आणि कविता Samiksha Salunke | Kaajal Tikli Ani Kavita 06
    2021/07/09

    Dedicated to all the artists in the world! ही कविता पर्सनल असली तरी माझी आणि माझ्या सगळ्या कलाकार मित्रांची युनिव्हर्सल कहाणी आहे.या कवितेतल्या चित्रकाराच्या जागी मी स्वतः आणि माझे कितीतरी चित्रकार सोबती राहिलेले आहेत आणि या संपूर्ण विवंचनेतून गेलेले आहेत. माझं म्हणणं असं नाही की आपण आपल्या कलाकार मित्रांची किंमत करत नाही.. आपण फक्त त्यांना त्यांच्या कामाची किंमत 'देत' नाही.. 

    続きを読む 一部表示
    6 分
  • ०५ | इच्छा | Wish काजळ टिकली आणि कविता Samiksha Salunke | Kaajal Tikli Ani Kavita 05
    2021/07/02

    ...रोज की तरह बॉस का मेरे, देर रात को फोन जो आया सौ किलो गालिया खा कर, एक बडा सा डकार लगाया...  कोणत्यातरी एका मूव्ही मध्ये पाहिलं होतं, खरंतर ऐकलं होतं "be careful of  what you wish for, what if it comes true?" आपण काय इच्छा मनात धरतोय  किंवा कळत नकळत नियतीकडे काय मागतोय त्याबद्दल सुध्दा आपण सतर्क राहायला  हवं.. जर खरंच ती सत्यात उतरली तर?

    続きを読む 一部表示
    6 分