『kalavrund (कलावृंद)』のカバーアート

kalavrund (कलावृंद)

kalavrund (कलावृंद)

著者: Ganesh inamdar
無料で聴く

このコンテンツについて

या पॉडकॉस्टचं नाव आहे कलावृंद.... आपण नेहमी ऐकतो की धन, संपत्ती माणसाला कसं जगायचं हे शिकवत असतील तर कला, संस्कृती हे माणसाला का जगायचं ते सांगतात.... या का चं उत्तर शोधण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे आपला हा कलावृंद..... नावाप्रमाणेच यात असतील कलावंतांचे किस्से, कलानिर्मितीच्या रंजक कहाण्या आणि विविध कलाकृतींचा मुक्त रसास्वाद..... इतकंच नाही तर विविध लोककलांचा मागोवा आणि त्यांच्या सांस्कृतिक संदर्भांचा आलेख..... तर मंडळी, भेटूया कलावृंदच्या या व्यासपीठावर आणि मस्त फेरफटका मारूया कलाजगतात...कलावृंद.... प्रवास समृध्द जगण्याचा....Ganesh inamdar アート
エピソード
  • राजा माणूस ( raja manus )
    2022/11/27

    यावर्षी ४ जूनला आपल्या सर्वांचे लाडके अशोकमामा म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची पंच्याहत्तरी झाली..... जवळजवळ अर्धशतकाहून अधिक काळ आपल्या अभिनयानं अनेक रसिकांना निखळ आनंद देणाऱ्या या अवलिया कलावंतानं चित्रपट, मालिका, नाटक अशा अनेक क्षेत्रांत मुक्त मुशाफिरी केली. अशोक सराफ हे नाव माहित नसलेला मराठी माणूस आज शोधूनही सापडणार नाही. आपल्या लाडक्या अशोकमामांनाही शब्दरूपी भेट सादर अर्पण....

    続きを読む 一部表示
    6 分
  • स्वरभास्कर (swarbhaskar)
    2022/11/19

    स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी.... भारतीय शास्त्रीय संगीतात या नावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. फक्त कर्नाटक संगीतच नव्हे, तर शास्त्रीय संगीताची अभिजात परंपरा जगभर पोहोचणाऱ्या उत्तुंग प्रतिभेच्या कलाकारांमध्ये पंडितजींचं नाव अग्रक्रमाने आणि आदरानं घेतलं जातं. पण भीमसेन गुरुराज जोशी या मुलाचा स्वरभास्कर बनण्यापर्यंतचा प्रवास त्यांच्या कुठल्याही मैफिलीइतकाच रोमहर्षक आणि थक्क करणारा आहे..... याच प्रवासाची ही एक छोटीशी झलक

    लेखन - अक्षय संत

    अभिवाचन - गणेश इनामदार

    続きを読む 一部表示
    8 分
  • छोटी बहू (choti bahu )
    2022/11/12


    भारतीय सिनेमाच्या इतिहासात काही व्यक्तिरेखा रजतपटावर अशा काही सादर झाल्या की त्यांना अभिजाततेचा दर्जा आपोआपच प्राप्त झाला. 'दो बिघा जमीन' चा शेतकरी, 'प्यासा' चा विजय, 'शोले' चा गब्बरसिंग ही काही प्रातिनिधिक उदाहरणं.... याच मांदियाळीतलं एक तेजोमय नाव म्हणजे मीनाकुमारीची 'छोटी बहू'..... गुरुदत्त निर्मित आणि अब्रार अल्वी दिग्दर्शित 'साहिब बीवी और गुलाम' या चित्रपटातली ही अत्यंत गाजलेली आणि गुंतागुंतीची व्यक्तिरेखा.... बिमल मित्र यांच्या याच नावाच्या कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटाकडे बंगालमधील जमीनदारी संस्कृतीचा होत गेलेल्या ऱ्हासाचं अत्यंत प्रत्ययकारी चित्रण या चित्रपटात पाहायला मिळालं. आपल्यापैकी बहुतेकांनी हा चित्रपट नक्कीच पाहायला असेल. यातील छोटी बहूच्या व्यक्तिरेखेचा हा आलेख....

    लेखन - अक्षय संत

    अभिवाचन - गणेश इनामदार

    続きを読む 一部表示
    7 分
まだレビューはありません