『Men's Mental Health Problems | Manisha Mone』のカバーアート

Men's Mental Health Problems | Manisha Mone

Men's Mental Health Problems | Manisha Mone

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る
या भागात आपण पुरुषांचं मानसिक आरोग्य (Men's Mental Health), Emotional Intelligence (EQ), Financial Stress, Marriage, Fatherhood आणि वैवाहिक नातेसंबंध** या आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाच्या पण कमी चर्चिल्या जाणाऱ्या विषयांवर Positive Psychologist मनीषा मोने यांच्यासोबत सखोल चर्चा केली आहे. समाजात पुरुषांकडून कायम खंबीर राहण्याची अपेक्षा केली जाते, पण त्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर, भावनिक आयुष्यावर आणि कुटुंबावर नेमका काय परिणाम होतो, याचा उलगडा या संवादातून होतो.पुरुष भावना व्यक्त का करत नाहीत? लग्नानंतर आई आणि बायकोमध्ये पुरुषांचं सँडविच होतं का? आजही पुरुषांवर मम्माज बॉय किंवा बायकोचा बैल हे टॅग सहज लावले जातात का? आर्थिक ताण (Financial Stress) पुरुषांच्या आत्मविश्वासावर, वैवाहिक नात्यावर आणि Intimacy वर कसा परिणाम करतो? Emotional Intelligence (EQ) कमी असल्यास नातेसंबंधांमध्ये कोणत्या समस्या निर्माण होतात? EQ चांगला असलेल्या किंवा अजिबात चांगला नसलेल्या पुरुषांच्या मुलांवर त्याचा कसा परिणाम होतो? मुळात प्रत्येकाला आपला EQ नेमका कसा आहे हे जोखता येतं का? पुरुषांनी मदत मागणं म्हणजे कमजोरी आहे का? अशा अनेक प्रश्नांवर पॉझिटिव्ह सायकॉलॉजिस्ट आणि एनएलपी प्रॅक्टिशनर मनिषा मोने यांच्यासोहत ‘देहभान’च्या या नवीन भागात सविस्तर चर्चा केलीय. या चर्चेत आपण Financial Stress मुळे पुरुषांच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम, Marriage मधील Emotional Connection, Midlife Crisis, Fatherhood, Parenting, मित्रांची भूमिका, Counselling आणि Therapy ची गरज, तसेच आई आणि पत्नी यांच्या नात्यात पुरुष का अडकतो? या सारख्या अनेक संवेदनशील विषयांवरही मोकळेपणाने चर्चा केली आहे. आजच्या प्रत्येक विवाहित पुरुषाने, पालकांनी आणि नातेसंबंध अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने हा एपिसोड नक्की पाहावा.जर तुम्हाला हा संवाद उपयुक्त वाटला असेल, तर Like करा, Comment करून तुमचं मत नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणी, कुटुंबीय आणि सहकाऱ्यांसोबत Share करा. अशाच अर्थपूर्ण आणि जीवन समृद्ध करणाऱ्या चर्चांसाठी Dehbhan Podcast ला Subscribe करायला विसरू नका.Timestamps 00:00 - Intro 03:54 – Do Men and Women Have Different Emotional Intelligence (EQ)?5:18 – Is Emotional Expression the Biggest Weakness in Men?10:25 – Why Do Many Men Still Struggle with Emotional Intelligence in 2026?13:05 – How Does an Emotionally Mature (or Immature) Father Shape His Children?18:37 – Can the 'Alpha Male' Mindset Negatively Impact Children?23:30 – Why Do Many Men Want to Be Different from Their Fathers—but Fear Their Children Will Become Like Them?35:20 – How Does Low Emotional Intelligence Affect ...
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません