『# 1954: "दोन गुरु - अपमान आणि भूक" लेखक नाना पाटेकर. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )』のカバーアート

# 1954: "दोन गुरु - अपमान आणि भूक" लेखक नाना पाटेकर. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

# 1954: "दोन गुरु - अपमान आणि भूक" लेखक नाना पाटेकर. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

概要

Send us a text

वयाच्या तेराव्या वर्षी तिशीची समज आली. भूक माझी सगळ्यात गोड मैत्रीण झाली आणि अपमान तिचा सावलीसारखा सोबती.

भूक कायम जागी असायची, माझ्या जिवंतपणाची खूण म्हणून. अपमान आला की डोळ्यांना पाझर फुटायचा, पण त्यानंच चिंतन शिकवलं.

हळूहळू कळलं, प्रत्येकाच्या आतड्यात भूकेची वसवट असते आणि अपमानाला जात नसते. हे उमगलं की उभं राहण्याआधी प्रत्येक जण रांगतो, उत्कर्षाच्या अलीकडच्या पायऱ्या भूक आणि अपमानच असतात.

आज मी पलीकडच्या तिरावर पोचलोय; ही गुरूमंडळी अलीकडच्या तीरावर उभी आहेत . माझ्या वाटेला येत नाहीत आता, ओळख नसल्यासारखी वागतात. पण त्यांची शिकवण माझ्यात जिवंत आहे.

======

まだレビューはありません