『# 1957: "ममा, मॉम, मम्मीच्या जमान्यातली वेगळीच 'आई'." ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )』のカバーアート

# 1957: "ममा, मॉम, मम्मीच्या जमान्यातली वेगळीच 'आई'." ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

# 1957: "ममा, मॉम, मम्मीच्या जमान्यातली वेगळीच 'आई'." ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

概要

Send a text

"टिचरने खूप कौतुक केलं त्याचं — फार सुंदर पेपर लिहितो म्हणाल्या. फक्त बोलता कमी येतं, म्हणून घरी इंग्रजीत बोलायला सांगितलं."
मी ऐकत होते.

तिने स्वतः इंग्रजीचा क्लास लावला होता, बदल्यात टीचरच्या पोळ्या करून देत होती. मी मनोमन तिच्या जिद्दीला सलाम केला.

“छोट्या गावात वाढले ताई… बाबा लवकर गेले… अकरावीत लग्न झालं… शिकायचं राहिलंच. पण आता याची आई म्हणून कमी पडणार नाही. बारावीचा फॉर्म भरलाय. उद्या याला माझी लाज वाटायला नको.”

मग हसत म्हणाली, “आज याला पोटभर पाणीपुरी खाऊ घालणार!”

अशी भेटली ती साधी, पण आतून खूप खंबीर आई !

=========

まだレビューはありません