-
サマリー
あらすじ・解説
गंगामाईच्या पवित्र काठावरीती भगवान श्यामसुंदराच्या परम् पावन कथेमध्ये तल्लीन असणारे महात्मा शुकदेवजी राजा परिक्षितीला श्रीमद् भागवत कथा वर्णन करून सांगतात. या कथेच्या सामर्थ्याने अवघ्या सात दिवसामध्ये राजा परिक्षितीचा उद्धार झाला. राजाचा उद्धार झाल्याने या कथेची महती उत्तरोत्तर वाढत गेली. अनेकानेक संत महापुरुषांनी ही श्रीमद् भागवत कथा जडजीवांच्या समोर वर्णन करून सांगितली. अनेक अज्ञानी जीवांना या कथेनी समाधान प्राप्त करून दिलं. तीच असणारी ही परम् पावन श्रीमद् भागवत कथा.