エピソード

  • RAJ'KARAN PODCAST | एकनाथ शिंदेंचा 'बाण' कोणाच्या वर्मी लागणार?
    2025/09/19
    गेल्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांचा मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये दौरा झाला. लोकसभेत मराठवाड्यातील एकमेव खासदार आणि विधानसभेत जिल्ह्यात सहा आमदार असे घवघवीत यश मिळाल्यानंतर शिंदे तब्बल 14 महिन्यानंतर संभाजीनगरच्या मतदारांचे आभार मानण्यासाठी आले. अर्थात निमित्त होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची पूर्वतयारी आणि पक्षांतर्गत कुरबुरी थांबवण्यासाठीचा खटाटोप.
    続きを読む 一部表示
    10 分
  • RAJ'KARAN PODCAST | देवेंद्र फडणवीस 'मराठा' समाजाचे नवे राजकीय नायक?
    2025/09/12
    मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मुंबईत का धडकले, सरकारने आंदोलकांना थोपविण्यासाठी काय प्रयत्न केले, मुंबईतील मराठा आंदोलन सरकारने कशा पद्धतीने हाताळले... या सर्वच प्रश्नांवर चर्चा करण्याची गरज आहे. आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी एकीकडे प्रशासकीय यंत्रणा मार्ग काढत असताना राजकीय पातळीवर आंदोलन कसे हाताळले गेले, हेही तपासणे गरजेचे आहे.
    続きを読む 一部表示
    8 分
  • RAJ'KARAN PODCAST | संघशताब्दी निवडणूक इच्छुकांसाठी नामी संधी
    2025/09/05
    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामात असल्यानंतर संघाच्या संपर्कामुळे आगामी निवडणुकीत मदत होईल, उमेदवारी मिळविण्यात अडचणी येणार नाहीत असे इच्छुकांना वाटत आहेत. त्यामुळे संघाच्या कामाकडे एक नामी संधी म्हणून भाजप कार्यकर्ते पाहत आहेत.
    続きを読む 一部表示
    11 分
  • RAJ'KARAN PODCAST | एका एका शिलेदाराने अडचणीच्या काळात काढला पळ; मराठवाड्यात काँग्रेसचा हात दुबळा!
    2025/08/29
    मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि सुरेश वरपूडकर भाजपात दाखल झाले. तर परतूरचे माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
    続きを読む 一部表示
    13 分
  • RAJ'KARAN PODCAST | संघाच्या मुशीत घडलेला नेता पुन्हा भाजपमध्ये... अण्णा डांगेंनी घरट्यासाठी बदललं अंगण
    2025/08/22
    80-90 च्या दशकातील काँग्रेस नेतृत्वाला कट्टरपणे विरोध करणारे नेतृत्व म्हणून अण्णासाहेब डांगे यांची ओळख होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी अनेक पराभव पचवत भाजप रुजवण्यासाठी प्रयत्न केले. आता पुन्हा ते भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे भाजपला त्याचा फायदाच होईल.
    続きを読む 一部表示
    11 分
  • RAJ'KARAN PODCAST | कबुतरांच्या प्रश्नावरून कोंडी : प्रश्न मुंबईतील 25 टक्के मतांचा आहे..
    2025/08/15
    मुंबई शहरात कबुतरप्रेमी नागरिक आक्रमक झाले आहेत, तर तिकडे कोल्हापूरातील शिरोळ येथील मठामधील माधुरी हत्तीणीला वनतारा पुनर्वसन केंद्रात नेल्याने हजारो नागरिक रस्त्यावर आले आहेत. या दोन्ही प्रकरणांत जैन समाज हा समान धागा आहे.
    続きを読む 一部表示
    7 分
  • RAJ'KARAN PODCAST | Honey Trap Scandal : ‘हनी ट्रॅप’ फक्त संशयाचे धुके ! धूर निघतोय आग असेलच?
    2025/08/08
    राज ठाकरे जेथे जातील तेथे प्रसारमाध्यमे पोहोचतातच. ते प्रसारमाध्यमांना काही ना काही बातम्या पुरवतातच. इगतपुरीच्या या ‘रिसॉर्ट’वर ठाकरेंनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी अनौपचारिक संवाद साधला. त्या गप्पांच्या ओघात त्यांनी ‘तुमच्या नाशिकमध्ये काय चाललेय हे तुम्हाला माहीत नाही का? असा सवाल पत्रकारांना केला. तिथूनच 72 अधिकारी, राजकीय नेत्यांच्या ‘हनी ट्रॅप’च्या चर्चेला तोंड फुटले.
    続きを読む 一部表示
    10 分
  • RAJ'KARAN PODCAST | मराठीचा लळा प्रेमाने लागावा... पण त्यासाठी काय करायचं हेही राज्यपालांनी सांगायला हवे!
    2025/08/01
    मराठी भाषा मारहाण करून शिकून येणार नाही, असे मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले. मात्र आवड, सहिष्णुता आणि परप्रांतीयांना मराठी भाषेचा लळा लागावा, यासाठी प्रेमाने काय करता येईल, याबाबतचे मार्गदर्शन राज्यपालांनी करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर मराठीच्या हितासाठी राज्यपालांनी राज्य सरकारलाही काही गोष्टी सांगणे अत्यंत गरजेचे आहे.
    続きを読む 一部表示
    7 分